maharashtra

सातारा येथून दोन दुचाकींची चोरी


Theft of two bikes from Satara
गडकर आळी आणि देवी चौक परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील गडकर आळी आणि देवी चौक परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी १.३० ते १. ४५ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील गडकर आळीमध्ये असणाऱ्या धुमाळ हाइट्स अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम. एच. ११ सीएस ८०१९ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार रमेश हणमंत बारटक्के, रा. भवानी पेठ, सातारा यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
दुसऱ्या घटनेत दि. ३ फेब्रुवारी रोजी ५ ते १० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील देवी चौक परिसरातील कन्या शाळेजवळ पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम. एच. एइ- ६७८० अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार राजू गोपाळ आवळे, रा. रविवार पेठ, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला.