अज्ञात चोरट्याने एका शाळेतून शैक्षणिक साहित्याची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : अज्ञात चोरट्याने एका शाळेतून शैक्षणिक साहित्याची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 जानेवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान सदर बाजार येथील जय जवान प्राथमिक शाळेतील 7 हजार 620 रुपये किंमतीचे शालेय साहित्य अज्ञात चोरट्याने चोरी केले आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक गुरव करीत आहेत.


