येथील चरक आयुर्वेद दवाखान्यात समोरून अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून आतील 90 हजार रुपये किमतीच्या लॅपटॉपसह रोख रक्कम व कागदपत्रे चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील चरक आयुर्वेद दवाखान्यात समोरून अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून आतील 90 हजार रुपये किमतीच्या लॅपटॉपसह रोख रक्कम व कागदपत्रे चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ नोव्हेंबर रोजी १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय जाणाऱ्या मार्गावर चरक आयुर्वेद दवाखान्यासमोर दीपक वसंत तुपे, रा. वडुज, ता. खटाव व सुजित उबाळे यांच्या कारमध्ये ठेवलेला ९० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, रोक रक्कम व कागदपत्रे अज्ञात चोरट्याने कारच्या पाठीमागील दरवाजाची काच फोडून चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


