maharashtra

गाडीची काच फोडून सुमारे साडेतीन लाखांची चोरी


Theft of about three and a half lakhs by breaking the glass of the car
विसावा नाका येथे पार्क केलेल्या कारची अज्ञाताने काच फोडून कारमधील सुटकेसमधील 3 लाख 59 हजार 200 रुपयांची रोकड लंपास केली. ही रोकड सातार्‍यातील एका डॉक्टरची असून भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सातारा : विसावा नाका येथे पार्क केलेल्या कारची अज्ञाताने काच फोडून कारमधील सुटकेसमधील 3 लाख 59 हजार 200 रुपयांची रोकड लंपास केली. ही रोकड सातार्‍यातील एका डॉक्टरची असून भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
डॉ. संतोष श्रीरंग यादव (वय 44, रा.शाहूनगर, सातारा) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 23 रोजी दुपारी 4.45 ते  6.30 या कालावधीत घडलेली आहे. डॉक्टरांचे काम विसावा नाका येथे असल्याने त्यांनी त्यांची गाडी परिसरातील हॉटेल समोर पार्क केली होती. यावेळी त्यांच्या कारमध्ये पैसे होते. कारमध्ये कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने कारची पाठीमागील काच फोडली. आतमध्ये असलेल्या सुटकेसमधून चोरट्याने रोख 3 लाख 59 हजार 200 रुपये व हॉस्पिटलची कागदपत्रे असा मुद्देमाल लंपास केला.