दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक देऊन स्वतः जखमी होत निवास मारुती पवार रा. सासपडे, ता. सातारा यांना जखमी केल्याप्रकरणी एकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक देऊन स्वतः जखमी होत निवास मारुती पवार रा. सासपडे, ता. सातारा यांना जखमी केल्याप्रकरणी एकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२९ एप्रिल रोजी आठ वाजण्याच्या सुमारास अंकुश माणिक यादव, रा. सासपडे, ता. सातारा हे दुचाकी क्रमांक एम.एच.११ बीइ ६६०७ सातारा येथून हरपळवाडीकडे घेऊन जात असताना ती अविचाराने चालवून दुसरी दुचाकी क्रमांक एम.एच. ११ बीइ २८९१ ला धडक देऊन स्वतः गंभीर जखमी होऊन दुसरे दुचाकी चालक निवास मारुती पवार यांना जखमी केल्याची तक्रार पोलीस उपनिरीक्षक विजय देसाई यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली.


