maharashtra

रयत संस्थेच्या सहसचिवांच्या आश्वासनानंतर मनोहर कदम यांचे उपोषण मागे


रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव मेनकुदळे यांनी आश्वासन दिल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलेल्या आणि महाविद्यालयासमोर गुरुवारपासून आंदोलन करणाऱ्या मनोहर कदम यांनी तात्पुरत्या स्वरूपात आपले उपोषण मागे घेतले.

सातारा : रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव मेनकुदळे यांनी आश्वासन दिल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलेल्या आणि महाविद्यालयासमोर गुरुवारपासून आंदोलन करणाऱ्या मनोहर कदम यांनी तात्पुरत्या स्वरूपात आपले उपोषण मागे घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून सुमारे महिन्यांपूर्वी निलंबित केलेल्या मनोहर कदम यांनी गुरुवारी विविध मागण्यांसाठी महाविद्यालयाच्या समोर उपोषण सुरू केले होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते, महाविद्यालयातील विकसीन समितीच्या सभेमधील ऐन वेळेच्या विषयांमध्ये याबाबतचा ठराव घेऊन आपण तशी शिफारस संस्था प्रशासनाकडे केल्यामुळे माझे निलंबन झाले. वास्तविक तसा ठराव सभेमध्ये झाला नाही. त्यामुळे माझे निलंबन चुकीचे आहे. मला माझ्या प्राकृतिक कारणांमुळे रजा घ्याव्या लागल्या. त्या सर्व बिनपगारी झाल्या आहेत. मार्च २०१४ पासून डिसेंबर २०२१ पर्यंत याच महाविद्यालयातील एक सेवक विनापरवानगी विनावेतन इतर आस्थापनामध्ये काम करीत होते. त्यामुळे माझे नीलमन रद्द करून प्रलंबित पहिली आश्वासित योजना लागू करावी. रोखलेल्या वेतन वाढीचा विचार करून महाविद्यालयामधील येणे- देणे व्यावहारिक माझी देय रक्कम मला देण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी रात्री उशिरा रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव मेनकुदळे यांनी त्यांच्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने मनोहर कदम यांनी आपले उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले.