दोन वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : दोन वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ मार्च रोजी सहा वाजण्याच्या सुमारास कृष्णानगर सातारा येथील कॅनॉलशेजारी असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये तेथीलच दीपक अशोक साळवे याने सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या जमाव जमवून वाढदिवस साजरा करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची तक्रार पोलीस शिपाई चेतन ठेपणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर दीपक साळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत दि. १६ मार्च रोजी ६ ते ८ वाजण्याच्या सुमारास पिरवाडी, (खेड) ता. सातारा येथील मरिआई देवीच्या मंदिरासमोर अभिजीत उर्फ अबु राजू भिसे, रा. मोळाचा ओढा सातारा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सार्वजनिक शांततेचा भंग करून आरडाओरडा करीत वाढदिवस साजरा केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


