बोरगाव, ता. सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या पाच वर्षे मुलाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
सातारा : बोरगाव, ता. सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या पाच वर्षे मुलाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मल्हारी अंबादास तांदळे, रा. खरकटवाडी, ता. आष्टी, जि. बीड हा पाच वर्षे मुलगा ट्रॅक्टर चालकाच्या शेजारी बसला होता. चालकाने ट्रॅक्टर पुढे नेहत असताना तो मुलगा खाली पडल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला. त्याला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र दि. १६ रोजी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची खबर डॉक्टर प्रांजली भोसले यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली.


