साताऱ्यात लाडू-चिवडा महोत्सव सात तारखेपासून सुरू
ना नफा, ना तोटा तत्वावर उपक्रमाचे आयोजन
व्यापारी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने गेल्या 19 वर्षापासून सुरू असलेला लाडू-चिवडा महोत्सव येत्या 7 नोव्हेंबर पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत नऊ दिवसांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पतसंस्थेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
सातारा : व्यापारी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने गेल्या 19 वर्षापासून सुरू असलेला लाडू-चिवडा महोत्सव येत्या 7 नोव्हेंबर पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत नऊ दिवसांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पतसंस्थेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद आहे की, महागाईच्या काळात नागरिकांना माफक दरात दिवाळी फराळातील लाडू-चिवडा मिळावा याकरिता व्यापारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुप्रसाद सारडा यांच्या संकल्पनेतून गेल्या 19 वर्षापासून सुरू आहे . यंदाही हा लाडू चिवडा महोत्सव सुरू ठेवण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पतसंस्थेचे चेअरमन दिलीप पिलके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या लाडू-चिवड्याच्या तयारीमध्ये बेसन, तेल, साखर, शेंगदाणे, पोहे, चुरमुरे दर्जेदार वापरले जातात. यामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. हा लाडू-चिवडा ना नफा, ना तोटा या तत्त्वावर नागरिकांना देण्यात येणार आहे. यावर्षी मजुरी, इंधन, लागणारा कच्चामाल यामध्ये अधिक वाढ झाली आहे. असे असताना पण चिवडा व लाडू प्रत्येकी 160 रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाडू-चिवडा पाकीट भरत शेठ राऊत मिठाईवाले मल्हार पेठ यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. सातारकरांनी या महोत्सवाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन दिलीप पिलके यांनी केले आहे.


