maharashtra

जिल्ह्यातून दोन मुली बेपत्ता


Two girls are missing from the district
सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहुन दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहुन दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील गुरुवार पेठ परिसरात वास्तव्य करणाऱी एक युवती कॉलेजला योगा क्लास साठी जाते असे सांगून घरातून निघून गेली आहे ती अद्याप घरी परत न आल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दुसऱ्या घटनेत दि.२१ जुलै रोजी ६ वाजण्याच्या सुमारास कराड येथील गणेश मंगल कार्यालय परिसरात वास्तव्य करणारी एक युवती सातारा येथे जाते, असे सांगून निघून गेली ती अद्याप परत न आल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.