विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऑक्टोबर 2021 ते ऑक्टोबर 2022 अखेर वेळोवेळी प्रणाली निलेश गवळी हिचा जाचहाट केल्याप्रकरणी पती निलेश वसंत गवळी, सासू रुक्मिणी वसंत गवळी, दीर योगेश वसंत गवळी, जाऊ पुनम वसंत गवळी, नणंद स्नेहल संभाजी शिंदे सर्व रा. अंगापूर, ता. सातारा यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक राऊत करीत आहेत.


