maharashtra

दुखापत केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


येथील मतकर कॉलनी मध्ये एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दुसऱ्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील मतकर कॉलनी मध्ये एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दुसऱ्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ नोव्हेंबर रोजी साडेअकरा वाजता सातारा येथील मतकर कॉलनी येथील च श्याम महादेव टकसाळ त्यांना त्यांचा मुलगा लक्ष्मण श्याम टकसाळ याने तू लहानपणापासून आम्हाला संभाळले नाही. तू घरामध्ये राहायचे नाही असे म्हणत त्यांना हातातील लाकडी दणक्याने डोक्यात व हातावर मारहाण करून शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार शाहूपुरी पोलिसांनी दाखल झाली आहे.