maharashtra

रविवार पेठ परिसरातील दुचाकीची चोरी


येथील रविवार पेठ परिसरातील राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील रविवार पेठ परिसरातील राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ रोजी ९ ते दि. १६ रोजी ४ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील रविवार पेठेत घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच.११ सीझेड २०८८ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार जया सुरेश शिवगण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.