सातारा तालुक्यातील आरळे गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलाजवळील वळणावर एका भरधाव टँकरने धडक दिल्याने दोघे जखमी झाले तर अन्य दोघांच्या घराचे आणि दुकानाचे नुकसान झाले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात टँकरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. टँकरचालकाचे नाव समजू शकलेले नाही.
सातारा : सातारा तालुक्यातील आरळे गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलाजवळील वळणावर एका भरधाव टँकरने धडक दिल्याने दोघे जखमी झाले तर अन्य दोघांच्या घराचे आणि दुकानाचे नुकसान झाले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात टँकरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. टँकरचालकाचे नाव समजू शकलेले नाही.
याबाबतची तक्रार प्रकाश अमृता साबळे (वय ३२, रा. वडूथ, ता. सातारा) यांनी दिली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरळे गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलाजवळील वळणावर एकजण टँकर (एमएच ४५ - टी ६२१0) निष्काळजीपणे आणि वेगाने चालवत होता. यावेळी समोरुन सुरज मदने हा दुचाकीवरुन (एमएच ११ - सीवाय ५१४९) येत होता. त्याला टँकरने जोराची धडक दिली. यात सुरज याच्या डोक्याला आणि उजव्या डोळ्याच्या वर जोराचा मार लागला.
भरधाव वेगाने आलेल्या टँकरच्या धडकेत विशाल राजेंद्र नलवडे (रा. आळजापूर, ता. फलटण, जि. सातारा) याच्या उजव्या पायाला जोराचा मार लागला आहे. याचवेळी संदीप पोपट माने यांच्या घराची भिंत आणि दिनेश माने यांच्या दुकानाच्या शेड, कट्ट्याचे नुकसान झाले. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर टँकरचालक जखमींना कोणतीही मदत न करता पळून गेला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर टँकरचालकावर गुन्हा दाखल झाला असून त्याचे नाव मात्र समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करत आहेत.


