maharashtra

‘किसनवीर’मध्ये सत्तांतर

आ. मकरंद पाटील यांच्या पॅनेलने जिंकल्या सर्वच्या सर्व जागा; कारखाना परिसरात एकच जल्लोष

Independence in 'Kisanveer'
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ‘किसनवीर’ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालात आ. मकरंद पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने मुसंडी मारली असुन सर्वच्या सर्व 21 जागांवर तब्ब्ल तीन हजारच्या वर मताधिक्याने मोठा व दणदणीत विजयी मिळवत पंधरा वर्षांची मदन भोसले यांची सत्ता उलथवून टाकली आहे.

वाई : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ‘किसनवीर’ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालात आ. मकरंद पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने मुसंडी मारली असुन सर्वच्या सर्व 21 जागांवर तब्ब्ल तीन हजारच्या वर मताधिक्याने मोठा व दणदणीत विजयी मिळवत पंधरा वर्षांची मदन भोसले यांची सत्ता उलथवून टाकली आहे. या निवडणुकीत मदनदादाना ‘धोबीपछाड’ करत सभासदानी उचलबांगडी गेली आहे, तर आबांचा उदो- उदो केला आहे. पुन्हा एकदा वाई मतदारसंघात मकरंदआबा हिरो ठरले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेते मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. शेतकर्‍याचे अश्रू पुसण्यात दादा अपयशी ठरले हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. त्यांनाही शेतकरी सभासदांनी नाकारले असुन मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सायंकाळी पाच नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. पाचही तालुक्यात रात्री उशीरापर्यत विजयी उमेदवारांच्या मिरवणू का सुरु होत्या.
‘किसनवीर’ कारखाना निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजल्या पासून श्रीनिवास मंगल कार्यालय, एमआयडीसी वाई येथे सुरु झाली .154 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती..त्यापैकी निम्म्या म्हणजे 77 मतदान केंद्रांची पहिल्या फेरीत मतमोजणी सुरू झाली. सुरवातीला संस्था व ऊसउत्पादक गट यांच्या मतपत्रिका वेगवेगळ्या करून मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रत्येक्ष मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर एकूण कल पाहता आ. मकरंद पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलला मतदारांनी पहिली पसंती दिल्याचे दिसून आले. जसजशी मतमोजणी पुढे गेली तसतशी दोन्हीं पॅनेल मधील मतांचा फरक हा वाढत गेला. मदन भोसले यांचे पॅनेल पिछाडीवर पडताना दिसत होते. यामुळे निकालाचा कल हा पाटील बंधू व त्यांच्या पॅनेल च्या बाजूने झुकला असल्याचे स्प्ष्ट झाले होते. सोसायटी मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे आ. मकरंद पाटील यांनी मोठी आघाडी घेतल्याने विद्यमान संचालक रतन सिंह शिंदे हे पहिल्यापासून मागे पडले होते.
सोसायटी मतदार संघातून पहिल्या अखेर आ. मकरंद पाटील यांना 113 तर शेतकरी पॅनेलचे रतन शिंदे यांना 58 मते पडली होती. अनुसूचित जाती जमाती गटातून शेतकरी बचाव पॅनेलचे उमेदवार संजय कांबळे यांना 11 हजार 117 तर शेतकरी पॅनेलचे सुभाष खुडे यांना 7 हजार 46 मते मिळाली.
 भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून हणमंत चवरे यांना 10 हजार 982 तर चंद्रकांत काळे यांना 7 हजार 194 मते मिळाली. इतर मागासवर्ग प्रवर्ग गटातून शेतकरी बचाव पॅनेलचे शिवाजी जमदाडे यांना 11 हजार 31 मते मिळाली तर आनंदा जमदाडे यांना 7 हजार 117 मते पडली.
 महिला राखीव गटातून सरला वीर यांना 10 हजार 710 मते तर सुशीला जाधव यांना 10 हजार 215 मते मिळाली. आशा फाळके यांना 6 हजार 971 तर विजया साबळे यांना 6 हजार 877 मते मिळाली.
ऊस उत्पादक कवठे खंडाळा गट क्रमांक 1 मध्ये शेतकरी बचाव पॅनेलचे रामदास गाढवे 10 यांना 810 मते मिळाली तर संस्थापक शेतकरी पॅनेलचे उमेदवार दत्तात्रय गाढवे यांना 6 हजार 863 मते मिळाली तर नितीन जाधव पाटील यांना 10 हजार 877 व विरोधी पॅनेलचे उमेदवार प्रवीण जगताप यांन 6 हजार 807 मते. मिळाली.
शेतकरी बचाव पॅनेलचे किरण काळोखे यांना 10 हजार 771 तर विरोधी पॅनेलचे उमेदवार प्रताप यादव यांना 6 हजार 801 मते मिळाली आहेत. दोन्हीं पॅनेलच्या मतांमध्ये जवळपास चार हजार मतांचा फरक आहे. शेतकरी बचाव पॅनेलचे सर्व उमेदवार आघाडीवर असून त्यांची विजयाच्या दिशेने घौड दौड सुरू आहे. एकूणच पहिल्या फेरीअखेर विजयाचे चित्र स्पष्ट झाले आहे.
इतर गटातील पहिल्या फेरी अखेर दोन्हीं पॅनेलच्या उमेदवारांना पडलेली मते पुढील प्रमाणे...
ऊस उत्पादक भुईंज. गट क्रमांक... 2 मदन भोसले (7 हजार 81), प्रकाश धुरगुडे (10 हजार 583),रामदास इथापे (10 हजार 497), दिलीप शिंदे (6 हजार 669),
मानसिंग शिंगटे अपक्ष (75 मते), प्रमोद शिंदे (10 हजार 451), जयवंत पवार (6 हजार 885),
 बावधन जावली गट क्रमांक... सचिन भोसले (7हजार 1), विश्वास पाडळे (6हजार 808),दिलीप पिसाळ (10 हजार 907), शशिकांत पिसाळ (10 हजार 757),चंद्रसेन शिंदे (6 हजार 708), हिंदुराव तरडे (10 हजार 712)
 सातारा गट क्रमांक... 4 संदीप चव्हाण (10हजार 869),चंद्रकांत इंगवले (6हजार 847), भुंजगराव जाधव (6 हजार 883),सचिन जाधव (10 हजार 816),बाबासाहेब कदम (10 हजार 735), नवनाथ साबळे (61),अनिल वाघमळे (6 हजार 590),
 कोरेगाव गट क्रमांक.... 5 मेघराज भोईटे (6 हजार 950),नवनाथ केंजळे (6हजार 754), शिवाजी पवार (6हजार 752), दिलीप जाधव (52),ललित मुळीक (10 हजार 584)  रमेश माने (39),संजय फाळके (10 हजार 579), सचिन साळुंखे (10 हजार 719)
 दुसर्‍या फेरीत 17 हजार इतकी मत मोजली गेली. यामध्ये सोसायटी गटातून आ. मकरंद पाटील 238 एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. प्रतिस्पर्धी उमेदवार रतन शिंदे यांना 91 मते पडली. अनुसूचित जाती मधून संजय कांबळे हे तब्ब्ल 9 हजार 926 मतांनी विजयी झाले. भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून हणमंत चवरे हे विजयी झाले आहेत. त्यांनी चंद्रकांत काळे यांचा पराभव केला आहे. इतर मागासवर्ग प्रवर्ग गटातून शेतकरी बचाव पॅनेलचे शिवाजी जमदाडे हे विजयी झाले आहेत. महिला राखीव गटातून सरला वीर या ही मोठया मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
कवठे खंडाळा गट क्रमांक 1 मध्ये शेतकरी बचाव पॅनेलचे रामदास गाढवे हे विजयी झाले आहेत. नितीन जाधव-पाटील हेही याचं गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. भुईंज. गट क्रमांक... 2 मध्ये विद्यमान चेअरमन मदन भोसले यांचा दारुण पराभव झाला आहे. त्याचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश धुरगुडे हे मोठया फरकाने विजयी झाले आहेत. याशिवाय शेतकरी बचाव पॅनेलचे सर्वच उमेदवार हे साडेनऊ हजारच्या फरकाने विजयी झाले आहेत.