maharashtra

विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा


विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास तेजस ज्ञानेश्वर कदम वय 26 राहणार खेड तालुका सातारा यांना त्यांच्या घराशेजारी राहणारे रोहिदास शंकर सपकाळ, विजया रोहिदास सपकाळ, अनिरुद्ध रोहिदास सपकाळ, रवीरूप उर्फ गणेश रोहिदास सपकाळ आणि दोन अनोळखी इसमांनी आमच्या जागेत भांडी घासू नका ही जागा आमची आहे, असे म्हणून मारहाण केली. त्यावेळेस भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या तेजस कदम यांच्या आईच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत आईच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र भांडणामध्ये घेऊन गेले आहेत. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.