maharashtra

विलासपूर येथून 20 हजारांची जबरी चोरी


विलासपूर येथे 20 हजारांची जबरी चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : विलासपूर येथे 20 हजारांची जबरी चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 मार्च रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर, विलासपुर येथे श्रीमती उषा राजेंद्रकुमार तोरणे यांच्या राहत्या घरात घुसून तीन अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून चांदीचे पैंजण व रोख रक्कम असा एकूण वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मुसळे करीत आहेत.