maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा


One is charged with causing death
पादचार्‍यास धडकून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : पादचार्‍यास धडकून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोपर्डे गावच्या हद्दीतील शिंदेशाही हॉटेल शेजारी रस्ता ओलांडत असताना हिरदयसिंग मारावी वय 40, राहणार नांदा, जिल्हा दिंडोरी, मध्य प्रदेश यांस मारुती ओमनी ने धडक दिली. याबाबत ओमनी कारचालक सुभाष देवजी चव्हाण वय 32 राहणार प्रताप नगर तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर याच्यावर लोणंद पोलीस ठाण्यात मयूर लक्ष्मण गायकवाड राहणार तरडगाव तालुका फलटण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार पाडवी हे करीत आहेत.