maharashtra

शेंदुरजने येथे मारहाणीत उपसरपंच व त्यांचा मुलगा गंभीर जखमी


शेंदुरजने (ता वाई) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत  उपसरपंच व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले .याबाबत रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

वाई : शेंदुरजने (ता वाई) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत  उपसरपंच व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले .याबाबत रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
गावातील देविदास जगताप व इतरांनी माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. यावरून सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच  जयसिंग  जगताप व देविदास जगताप  यांच्यामध्ये वादावादी व धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर वाई पोलिस ठाण्यात  तक्रार देण्यात आली होती. दुपारी देविदास जगताप इतरांनी  या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी गजाने  जयसिंग व त्यांचा मुलगा प्रवीण जगताप यांना मारहाण केली. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबतची  माहिती मिळताच ग्रामस्थांनी रुग्णालय व पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत याबाबत तक्रार घेण्याचे काम सुरू होते. या प्रकारानंतर गावात तणावपूर्ण पण शांत वातावरण आहे.