maharashtra

जुगार अड्ड्यावर छापा


सातारा बस स्थानकात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून दोघांवर कारवाई केली आहे.

सातारा : सातारा बस स्थानकात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून दोघांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा बस स्थानकाच्या जवळील सम्राट वडापाव गाड्यांच्या बाजूस असलेल्या बंद टपरीच्या आडोशाला नाजीम गुलाब शेख वय 36, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा आणि यासीन इकबाल शेख, रा. शनिवार पेठ, सातारा हे जुगार घेताना शाहूपुरी पोलिसांना आढळून आले. त्यांच्याकडून 1132 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.