गोडोली, ता. सातारा येथे दारूच्या नशेत एकाला मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : गोडोली, ता. सातारा येथे दारूच्या नशेत एकाला मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१९ रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास गोडोली येथील साईबाबा मंदिरासमोर रस्त्यावर इंद्रजीत नारायण ताटे, वय ४०, रा. शिवराज पेट्रोल पंपाच्या मागे, संभाजीनगर सातारा याने दुचाकी अपघाताचा राग मनात धरून गाडी थांबून दारूच्या नशेत तुषार सुनील पोखरणीकर, वय ३२, रा. सातव नगर, हांडेवाडी रोड, हडपसर यांना लोखंडी रॉडने पायावर व पाठीवर मारहाण करून जखमी करून शिवीगाळ करीत धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


