ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि. 15 रोजी त्यांच्या स्मृतीस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.
कराड : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि. 15 रोजी त्यांच्या स्मृतीस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.
यावेळी खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजीत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील त्यांनी त्यांच्या स्मृतीस्तंभास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी गोळेश्वर ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच आदित्य मोहिते उर्फ़ सूदन बाबा यांनीही खाशाबा जाधव यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी रणजीत जाधव, यांच्यासह सागर जाधव, नितीन पाटिल, तुषार जाधव, मकरंद जाधव, अभिजीत माने, पृथ्वीराज साळुंखे व गणेश डुबल-इनामदार उपस्थित होते.


