क्लासमध्ये कोयता आणणाऱ्या त्या सहा विद्यार्थ्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : क्लासमध्ये कोयता आणणाऱ्या त्या सहा विद्यार्थ्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक फेब्रुवारी रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंशुल श्रेयस कोदे रा. सदर बाजार, सातारा याला घाबरवण्यासाठी पार्थ सचिन निकम रा. सदर बाजार सातारा, रिहान सलाउद्दीन मुल्ला रा. शाहूनगर गोडोली सातारा, गौरव विलास नांगरे राहणार गोळीबार मैदान सातारा, यश किरण जगदाळे राहणार पीरवाडी सातारा, सार्थक उमेश खंडझोडे राहणार मंगळवार पेठ सातारा आणि आयांश समीर शेख राहणार सैदापूर सातारा यांनी आपापसात कट करून क्लासमध्ये कोयता आणून अंशुल कोदे याला क्लासच्या पाठीमागे बोलावून घेऊन कोयता बेंचवर आपटून घाबरवले. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुसळे करीत आहेत.


