एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 30 जुलै रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास नरसिंग भानुदास कांबळे वय 25 राहणार वडगाव, पोस्ट निपाणी, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद याने
फरांदवाडी, तालुका फलटण गावच्या हद्दीत लोणंद रोडवर त्याच्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, बेदरकारपणे चालवून, रस्त्याच्या विरुद्ध बाजूला येऊन समोरून येणार्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात हेमंत बाबासाहेब पवार वय 35 यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद प्रीतम राजेंद्र चोरमले वय 30 राहणार फरांदवाडी, तालुका फलटण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदवली असून सपोनि शिंदे अधिक तपास करीत आहेत.


