अज्ञात दुचाकीने येथील मोती चौक परिसरात महिलेला धडक दिल्याने त्यात ती जखमी झाली.
सातारा : अज्ञात दुचाकीने येथील मोती चौक परिसरात महिलेला धडक दिल्याने त्यात ती जखमी झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ९ डिसेंबर २०२२ रोजी सातारा येथील मोती चौक परिसरात सौ. जयश्री राजेंद्र कासट, वय ६१ ही महिला रस्ता ओलांडत असताना अज्ञात दुचाकीने त्यांना धडक दिली त्यात त्या जखमी झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


