maharashtra

सातारा जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकीची चोरी


सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ डिसेंबर २०२२ रोजी ८.३० ते ६.४५ वाजण्याच्या सुमारास आगाशिवनगर, ता. कराड येथील सरिता बाजार रोड येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम.एच. ५० आर ५६८८ चोरून नेल्याची तक्रार स्नेहल सागर कुलकर्णी, रा. पोतले, ता. कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली.
दुसऱ्या घटनेत दि. ३० ते दि.३१ डिसेंबर २०२२ दरम्यान रहिमतपुर, ता. कोरेगाव येथील जोतिबाचा माळ वस्तीमध्ये असणाऱ्या घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम. एच. ११ ए.एस. ४६९२ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार धनाजी पांडुरंग राऊत यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली.