वडूज येथील झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे पावणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : वडूज येथील झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे पावणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान कृष्णा विठोबा करमारे राहणार वडूज, तालुका खटाव यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तीन लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस उपनिरीक्षक दीक्षित अधिक तपास करीत आहेत.


