maharashtra

जुगार अड्ड्यावरील दोन वेगवेगळ्या कारवाईत एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


One thousand rupees was seized in two separate operations at the gambling den
सातारा तालुका पोलिसांनी वडूथ आणि आरळे येथे दोन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यावर कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये अकराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सातारा : सातारा तालुका पोलिसांनी वडूथ आणि आरळे येथे दोन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यावर कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये अकराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
किरण तुकाराम जाधव वय 36 राहणार बडवत व मनोज राजेंद्र गुप्ते वय 26 राहणार शाहूपुरी यांना या प्रकरणी ताब्यात घेतले असून सीआरपीसी 41 व प्रमाणे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पहिल्या कारवाईत वडूथ गावच्या हद्दीत बिना ट्रेलर च्या पत्र्याच्या शेड च्या पाठीमागे किरण जाधव याला जुगाराच्या साहित्यासह रंगेहात पकडण्यात आले त्याच्याकडून 470 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले व मनोज गुप्ते याला आरळे येथे मारुती जाधव यांच्या घराच्या आडोशाला सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 632 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. सातारा तालुका पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.