maharashtra

यादोगोपाळ पेठेत ई-श्रम कार्ड नोंदणी सप्ताह

सप्ततारा मित्र मंडळाचा आगळावेगळा उपक्रम

E-Labor Card Registration Week at Yadogopal Peth
सातारा येथील पोस्ट ऑफिस सातारा जिल्हा व माजी उपनगराध्यक्ष सौ दिपाली राजू गोडसे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील यादोगोपाळ पेठेत असंघटीत महिला व पुरुष कामगारांसाठी डाकघर भारत विभाग श्रम मंत्रालय केंद्र सरकार व प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत समाजातील 24 प्रकारच्या असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड विशेष नोंदणी सप्ताह सुरू करण्यात आला आहे.

सातारा : सातारा येथील पोस्ट ऑफिस सातारा जिल्हा व माजी उपनगराध्यक्ष सौ दिपाली राजू गोडसे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील यादोगोपाळ पेठेत असंघटीत महिला व पुरुष कामगारांसाठी डाकघर भारत विभाग श्रम मंत्रालय केंद्र सरकार व प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत समाजातील 24 प्रकारच्या असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड विशेष नोंदणी सप्ताह सुरू करण्यात आला आहे.
सात फेब्रुवारी रोजी यादोगोपाळ पेठेतील सातारा जिल्हा बाल विकास समिती येथे या योजनेचा शुभारंभ सातारा जिल्हा पोस्ट ऑफिस च्या प्रमुख अपराजिता म्रिधा, सातारा शहर पोस्ट ऑफिस प्रमुख सविता दळवी, पोस्ट विभागाचे सचिन कामठे, माने, बिचकर, दीपा ढवळे, माजी उपनगराध्यक्ष सौ. दिपाली राजू गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना अपराजिता म्रिधा म्हणाल्या, असंघटित कामगारांसाठी सौ दिपाली राजू बोरसे यांनी पुढाकार घेऊन ही योजना एकाच ठिकाणी चालू केली याचा लाभ समाजात काम करणाऱ्या 24 प्रकारच्या असंघटित कामगारांना होणार असून 7 फेब्रुवारी पासून भारतातील प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये ही योजना चालू करण्यात आली आहे. तसेच या कार्ड च्या माध्यमातून कार्ड नोंदणी झाल्यानंतर सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या सर्व योजना थेट असंघटित कामगारांना मिळणार आहेत. दीपाली गोडसे यांनी राबवलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.
सातारा शहर पोस्ट ऑफिस च्या प्रमुख सविता दळवी यावेळी बोलताना म्हणाल्या ई-श्रम कार्डच्या माध्यमातून असंघटीत महिला-पुरुष कामगारांना दोन लाख रुपये चा अपघात विमा अथवा इतर वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहेत. ही योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी सातारा शहराबरोबरच सौ. दिपाली गोडसे यांनी सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले असून त्यांचा हा निर्णय नक्कीच असंघटित कामगारांसाठी फायद्याचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजू गोडसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राजेश कानिम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सप्ततारा मंडळ, सप्ततारा महिला बचत गट, भारती भोसले, मयुरी कुडाळकर, गौरव पवार, सातारा शहर पोस्ट ऑफिस मधील अनेक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विशेष सहकार्य सातारा जिल्हा बाल विकास समितीचे लाभले.