maharashtra

संभाजी नगरात 70 हजारांची घरफोडी


संभाजी नगरात अज्ञात चोरट्याने 70 हजारांची घरफोडी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : संभाजी नगरात अज्ञात चोरट्याने 70 हजारांची घरफोडी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 ते 27 जानेवारी दरम्यान शिवराज पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या चिंतामणी रेसिडेन्सी येथील विशाल बाळासाहेब गोवे यांच्या दुसऱ्या मजल्यावरील वेल्थकेअर ट्रेडिंग शेअर मार्केट क्लासच्या फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने बारा हजार रुपये रोख, पंधरा हजार रुपये किमतीचा 55 इंची क्रोमा कंपनीचा एलईडी टीव्ही, चाळीस हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप, तीन हजार रुपये किमतीचे एक गिटार असा 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार दगडे करीत आहेत.