झिरपवाडीनजिक रस्त्यावर युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ
संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह : खून की अपघात याचे गुढ
फलटण तालुक्यातील झिरपवाडी गावात फलटण-दहिवडी रस्त्यावर गुरुवारी सकाळी एका 26 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धीरज गुंजवटे असे मृत युवकाचे नाव असून त्याच्या डोक्याला, नाकाला मार लागलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मात्र, घटनास्थळापासून अर्धा कि. मी. अंतरावर त्याचा मोबार्इल आढळला असल्याने हा प्रकार खून की अपघात, अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती.
फलटण : फलटण तालुक्यातील झिरपवाडी गावात फलटण-दहिवडी रस्त्यावर गुरुवारी सकाळी एका 26 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धीरज गुंजवटे असे मृत युवकाचे नाव असून त्याच्या डोक्याला, नाकाला मार लागलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मात्र, घटनास्थळापासून अर्धा कि. मी. अंतरावर त्याचा मोबार्इल आढळला असल्याने हा प्रकार खून की अपघात, अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती.
याबाबत अधिक माहिती अशी, झिरपवाडी गावात सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फलटण ते दहिवडी रस्त्यावर धीरज गुंजवटे या युवकाचा मृतदेह एका चारीत आढळून आला. सकाळी काही युवक व्यायामास गेले होते त्यांना हा मृतदेह दिसला. जवळ जावून पाहिले असता तो धीरजचा मृतदेह असल्याचे लक्षात आले. या युवकांनी ही घटना गावात कळवली. त्यानंतर फलटण शहर पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती देण्यात आली.
ही घटना कळताच फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा सुरु असताना धीरज गुंजवटे याचा मोबार्इल ॅक केला असता तो घटनास्थळापासून अर्धा कि. मी. अंतरावर रस्त्यावर पडलेला होता. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. मात्र, जर धीरजचा अपघात झाला असेल तर घटनास्थळापासून मोबार्इल एवढ्या लांब कसा पडला ? असाही प्रश्न उपस्थित होत असून नेमका हा अपघात की खून, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु होती.
याबाबत सचिन तात्याबा गुंजवटे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी घटनेचे धागेदोरे तपासण्याचे काम सुरु केले आहे. या घटनेमुळे झिरपवाडीत खळबळ उडाली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ हे करीत आहेत.


