maharashtra

शॉक लागून एकाचा मृत्यू


दौलतनगर, ता. सातारा येथील 45 वर्षीय नितीन कदम यांना शॉक लागला. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.

सातारा : दौलतनगर, ता. सातारा येथील 45 वर्षीय नितीन कदम यांना शॉक लागला. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.  
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिताराम नवघणे यांच्या घराचे रंगकाम सुरू होते. यावेळी स्लॅप घासण्यासाठी सूरू असलेल्य ग्रॅन्डर ची वायर पायाखाली आल्याने नितीन कदम यांना शॉक लागला. त्यामुळे ते जागीच बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार डोंबाळे करत आहेत.