maharashtra

सातारा जिल्ह्यात महायुती चा डंका

जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांची माहिती

सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती ने महाविकास आघाडी ला धोबीपछाड दिला असल्याची माहिती भा ज पा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी दिली.

सातारा : सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती ने महाविकास आघाडी ला धोबीपछाड दिला असल्याची माहिती भा ज पा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपैकी पैकी भाजपा 59, शिवसेना शिंदे गट 27, राष्ट्रवादी अजितदादा गट 21 अशा एकूण महायुतीला 107 ग्रामपंचायतीत यश मिळाले, तर महाविकास आघाडीला फक्त 20 ग्रामपंचायतीत समाधान मानावे लागले. सातारा जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे मत धैर्यशीलदादा कदम त्यांनी व्यक्त केले.
महायुतीला मिळालेल्या विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमारभाऊ गोरे, डॉ.अतुल भोसले, मदनदादा भोसले, नरेंद्र पाटील, डॉ सौ प्रियाताई शिंदे, मनोजदादा घोरपडे, विक्रम पावसकर, सुनीलतात्या काटकर, रामकृष्ण वेताळ यांनी अभिनंदन केले.
महायुतीच्या विजयाचा महामेरू आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही असाच पुढे जाईल आणि महाविजय 2024 साकार करेल. या विजयाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो, असे सूचक वक्तव्य जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी केले.