maharashtra

पाण्यात बुडल्याने वृद्धाचा मृत्यू


पाण्यात पडून बुडल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : पाण्यात पडून बुडल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान बाबुराव बाळू बरकडे वय 76, रा. संगम माहुली, ता. सातारा यांचा पाय घसरून ते नदीत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक दळवी करीत आहेत.