maharashtra

हरिष पाटणे यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या जिल्हा पत्रकार भवनाचे होणार लवकरच लोकार्पण; विनोद कुलकर्णी यांनी केली घोषणा

पुढच्या वर्षीचा पत्रकार दिन पत्रकार भवनातच साजरा करणार : हरिष पाटणे यांनी व्यक्त केला संकल्प

सातारा जिल्ह्यामध्ये मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत सातारा जिल्ह्यामध्ये हरीष पाटणे यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या जिल्हा पत्रकार भवनाचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याची घोषणा सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केली आहे, तर या पुढील पत्रकार दिनाचा कार्यक्रम आपल्या हक्काच्या पत्रकार भवनातच साजरा केला जाईल, असा संकल्प  सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.
हरीष पाटणे यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या सातारा जिल्हा पत्रकार भवनाच्या कार्याबद्दल राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर यांनी हरीष पाटणे व सर्व पत्रकारांचे तोंड भरून कौतुक केले.
मराठी पत्रकार सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. यानिमित्त राज्यभर मराठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम साजरा केला जातो.
यंदाचा मराठी पत्रकार दिन 191 व्या वर्षात पदार्पण करत असून आज मराठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील मराठी पत्रकार परिषद,डिजिटल मीडिया परिषद आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा माहिती कार्यालयाच्या सभागृहामध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सातारा जिल्ह्यातील मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष दीपक प्रभावळकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दीपक शिंदे, जेष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, डिजिटल मीडिया पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष सनी शिंदे, चंद्रसेन जाधव, ज्येष्ठ पत्रकार केशव चव्हाण, संदीप कुलकर्णी, प्रवीण शिंगटे, विठ्ठल हेंद्रे, आदेश खताळ, विनीत जवळकर, प्रतीक भद्रे, मनोज पवार, महेश पवार, प्रशांत शिराळकर, दत्ता सुपेकर, महेश चव्हाण, अमित वाघमारे, महेंद्र खंदारे, सूर्यप्रताप कांबळे, प्रकाश वायदंडे, मृणाल देवकुळे तसेच मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.