maharashtra

दुचाकीच्या धडकेत महिला ठार


दुचाकीने धडक दिल्याने एक महिला ठार झाली असल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सातारा : दुचाकीने धडक दिल्याने एक महिला ठार झाली असल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते सव्वा बारा दरम्यान गोजेगाव, तालुका सातारा गावच्या हद्दीत सातारा- रहिमतपूर रोडवर प्रतीक प्रवीण पवार वय 21, रा. रहिमतपूर, तालुका कोरेगाव याने त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच 11 सी वाय 62 झिरो सात ही भरधाव वेगात चालवून तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कुसुम यशवंत घोरपडे वय ७२ राहणार गोजेगाव, तालुका सातारा या पायी रस्ता ओलांडत असताना धडक दिली. घोरपडे या गंभीर जखमी झाल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद संजय महादेव घोरपडे वय 52 रा. गोजेगाव, तालुका सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.