सातारा जिल्ह्यातून तिन वेगळ्या ठिकाणावरुन तिन जण बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातून तिन वेगळ्या ठिकाणावरुन तिन जण बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ रोजी साताऱ्यातील मंगळवार पेठेतील येथील राहत्या घरातून एक १९ वर्षीय युवती कॉलेजला जाते असे सांगून निघून गेली ती परत आली नाही. तिचा मैत्रिणी व सातारा शहर परिसरात शोध घेतला असता ती कोठेही मिळाली नसल्याची तक्रार ज्या पालकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली.
दुसऱ्या घटनेत दि.१९ रोजी सुनील शंकर पुकळे वय ३२, रा. पुकळेवाडी, ता. ता.माण हे घरात कोणास काहीएक न सांगता निघून गेलै असल्याची तक्रार सारिका सुनील पुकळे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे.
तिसऱ्या घटनेत दि.१९ रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सातारा येथील शनिवार पेठेतील राहत्या घरातून एक वीस वर्षीय युवती परीक्षेला जाते असे सांगून कोठेतरी निघून गेली. तिचा नातेवाईक, मैत्रिणी यांच्याकडे शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही. तिचा मोबाईल बंद लागत असल्याची तक्रार तिच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.


