maharashtra

कोटेश्वर चौक परिसरात सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई, अल्टो चालक ताब्यात

कोटेश्वर चौक ते शाहूपुरी चौक यादरम्यान अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एकाला शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अल्टो कार सह ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक लाख 24 हजार 280 रुपयांचा दारूचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सनी विकास कासुर्डे (राहणार देशमुख नगर मेढा तालुका जावली ) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सातारा : कोटेश्वर चौक ते शाहूपुरी चौक यादरम्यान अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एकाला शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अल्टो कार सह ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक लाख 24 हजार 280 रुपयांचा दारूचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सनी विकास कासुर्डे (राहणार देशमुख नगर मेढा तालुका जावली ) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईबाबतची मिळालेली माहिती अशी, शाहूपुरी पोलिसांना लाल रंगाच्या अल्टो कारमधून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी गेंडामाळ नाका येथे सापळा लावला. मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान एक अल्टो कार येताना पोलिसांनी दिसली. पोलिसांनी कार चालकाला वाहन थांबवण्याचा इशारा केला तरी तो पळून जाऊ लागला. म्हणून गुन्हे पथकाने सदर कारचा पाठलाग करून घेराव घालून कार पकडली. या कारची पाहणी केली असता त्यात देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत एक लाख 24 हजार 280 रुपये असल्याचे निश्चित झाले.
पोलीस नाईक स्वप्नील कुंभार यांनी कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे व पोलीस हेड कॉन्स्टेबल माधुरी शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, अभिजीत यादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, स्वप्निल सावंत, सचिन पवार यांनी या कारवाईत भाग घेतला होता.