maharashtra

सातारा येथील महिलेच्या जाचहाट प्रकरणी पाच जणांवर गुन्हे


Crimes against five persons in the case of interrogation of a woman in Satara
सातारा येथील महिलेचा सासरी कराड येथे पाच जणांनी जाचहाट केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा येथील महिलेचा सासरी कराड येथे पाच जणांनी जाचहाट केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ जुन २०२१ ते १ जुन २०२२ दरम्यान मानसी कृष्णकांत विश्वास, वय २७ मूळ रा. नम्रता अपार्टमेंट, रुक्मिणी इस्टेट शिवानी हाउसिंग सोसायटी शनिवार पेठ कराड सध्या रा. शनिवार पेठ, सातारा या विवाहितेचा कृष्णकांत विश्वास, रॉबिन विश्वास, रत्ना विश्वास, रा. नम्रता अपार्टमेंट, कराड, दिलीप दिगंबर कोपर्डे, रा. कराड, अजित डावखरे, रा. ओगलेवाडी, ता. कराड यांनी संगणमत करून बेकायदेशीर पैशाची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच वडील व नातेवाईकांनी लग्नामध्ये दिलेल्या वस्तू परत न करता त्या वस्तूंचा अपहार केल्याची तक्रार मानसी विश्वास यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.