maharashtra

आरळे येथून सुमारे साडेसोळा हजार रुपयांची चोरी


Theft of about sixteen and a half thousand rupees from Arale
आरळे, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे साडेसोळा हजार रुपयांची चोरी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : आरळे, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे साडेसोळा हजार रुपयांची चोरी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८  ते दि. २९ दरम्यान आरळे येथे  लीलाधर सुर्यकांत घाडगे यांच्या घराचा अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून आत प्रवेश करून घरात असलेले सुमारे साडेसोळा हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.