तीनशे रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी विद्युत निरीक्षण विभागातील एक कनिष्ठ लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला.
सातारा : तीनशे रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी विद्युत निरीक्षण विभागातील एक कनिष्ठ लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोकसेवक महेश सागर शिवशरण वय 45 हे विद्युत निरीक्षण विभागातील उद्योग ऊर्जा व कामगार विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. दि. 3 ऑक्टोबर रोजी पडताळणी कारवाई वेळी निकेश अरविंद अहिरे वय 24, रा. चिमणपुरा पेठ, सातारा यांना महेश शिवशरण यांनी तारतंत्री प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तीनशे रुपयांची मागणी केली. त्याप्रमाणे तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना विद्युत निरीक्षण विभागातील उद्योग ऊर्जा व कामगार विभागात महेश शिवशरण लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक सचिन राऊत अधिक तपास करीत आहेत.


