maharashtra

साताऱ्यातील युवकाला सासरा आणि मेहुण्याकडून अहमदनगरमध्ये चोप


Young man from Satara beaten by father-in-law and sister-in-law in Ahmednagar
पत्नीला आणण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे साताऱ्या वरून गेलेल्या युवकाला सासरा आणि मेव्हण्याने बेदम मारहाण केली.

सातारा : पत्नीला आणण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे साताऱ्या वरून गेलेल्या युवकाला सासरा आणि मेव्हण्याने बेदम मारहाण केली. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी साताऱ्यातील पोलिस मुख्यालयासमोर संबंधित युवकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न केला. शनिवार दिनांक 14 रोजी घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस आली
या प्रकरणी पोलिसांनी नवनाथ अशोक महापुरे 32 राहणार मल्हार पेठ सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात आत्महत्या चा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी नवनाथ महापुरे हा शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास बाटलीतून पेट्रोल घेऊन पोलीस मुख्यालय समोर आला. त्याने हातातील पेट्रोल अंगावर ओतले. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी महापुरी ला पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
त्याच्याकडे पोलिसांनी या प्रकाराची चौकशी केली असता त्याने आपल्याला झालेल्या मारहाणीची माहिती दिली. नवनाथ ची पत्नी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे काही दिवसापूर्वी माहेरी गेली आहे. तिला आणण्यासाठी तो श्रीगोंदा येथे गेला असता त्याचा मेहुणा महावीर गायकवाड व सासरे सर्जेराव गायकवाड यांनी त्याला मारहाण केली. त्यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे सांगितले. राहुल खाडे यांच्या तक्रारीवरून महापुरे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.