सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोघी बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोघी बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.७ जुलै रोजी एक वाजण्याच्या सुमारास वाघोशी तालुका खंडाळा गावच्या हद्दीतून राहत्या घरातून सौ. मंगल हिराचंद धायगुडे, वय ३८ ही महिला जनावरांना चारा टाकायला जाते असे सांगून घरातून निघून गेली ती अद्याप परत न आल्याची तक्रार प* हिराचंद धायगुडे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसऱ्या घटनेत, दि. ५ जुलै रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पवाराची निगडी, ता. सातारा येथे जात असताना सातारा येथील बढीया पेट्रोल पंप येथून दीक्षा चैतन्य गुरव, वय ३०, रा. चिमणगाव, ता. कोरेगाव ही महिला नजर चुकवून कोणास काही न सांगता अचानक निघून गेल्याची तक्रार मारुती बाजीराव पवार, रा. पवारच्या निगडी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


