maharashtra

पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू


राहत्या घरी स्वतःस पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : राहत्या घरी स्वतःस पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयश्री राजेंद्र निकम रा. शेंद्रे, ता. सातारा या महिलेने राहत्या घरी पेटवून घेतल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक महांगडे करीत आहेत.