वाढे फाटा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : वाढे फाटा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 जुलै ते 10 ऑक्टोबर 2023 दरम्यान रोहित श्रीराम वाबळे रा. शनिवार पेठ, सातारा यांची वाढे फाटा सातारा येथील बुस्टन चहाच्या दुकानासमोर पार्क केलेली पॅशन प्रो कंपनीची मोटरसायकल क्र. एमएच 12 एचजे 9288 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.


