बेदरकारपणे वाहने चालवल्या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : बेदरकारपणे वाहने चालवल्या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील वायसी कॉलेज ते पोवई नाका रोडवर बेदरकारपणे रिक्षा चालवल्या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संतोष बोराटे (रा.करंजे), इक्बाल शेख (वय 52, रा.मल्हार पेठ, सातारा) यांच्या विरुध्द वाहतुक पोलिसांनी तक्रार दिली आहे. दि. 27 नोव्हेबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केल्या आहेत.


