maharashtra

कामकाजात सुधारणा करा, अन्यथा जनावरे टेबलाला बांधू : प्रताप जाधव

पुसेगाव मधील पशुवैद्यकीय दवाखान्याचा भोंगळ कारभार..

गेले पाच ते सहा महिने झाले पुसेगाव मधील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार भोंगळ चालू असून वैद्यकीय अधिकारी कधीही दवाखान्यात उपलब्ध नसतात. बाहेरगावावरून येणार्‍या शेतकर्‍यांच्या जनावरांना कोणतीही सुविधा मिळत नाही. मिळाल्यास वैद्यकीय विभागाकडून त्याच लागणारे औषध सुद्धा या दवाखान्यात उपलब्ध नसतात.

पुसेगाव : गेले पाच ते सहा महिने झाले पुसेगाव मधील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार भोंगळ चालू असून वैद्यकीय अधिकारी कधीही दवाखान्यात उपलब्ध नसतात. बाहेरगावावरून येणार्‍या शेतकर्‍यांच्या जनावरांना कोणतीही सुविधा मिळत नाही. मिळाल्यास वैद्यकीय विभागाकडून त्याच लागणारे औषध सुद्धा या दवाखान्यात उपलब्ध नसतात. त्यामुळे पुसेगाव परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून आज सर्व शेतकर्‍यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांस जाब विचारण्यासाठी घेराव घातला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी लोखंडे यांना शेतकर्‍यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे देता आली नाहीत. बैठकी आणि कामाचा अधिभार असल्यामुळे मला सेवा देता येत नाही, अशी उत्तरे संबंधित अधिकारी यांच्याकडून देण्यात आली. जिल्हास्तरीय अधिकार्‍यांना विचारले असता कोणत्याही प्रकारचा अधिभार संबंधित अधिकार्‍याकडे नाही असे यांच्याकडून कळविण्यात आले. तरीसुद्धा नक्की कोणता गोलमाल या संबंधित विभागात चालला आहे, असा प्रश्न शेतकर्‍यांमध्ये उपलब्ध झाला आहे. संबंधित शेतकर्‍यांनी जनावराला जखम झाली म्हणून या दवाखान्यात आणले असता जखमेसाठी कापूस दवाखान्यात उपलब्ध नाही, असे अधिकार्‍यांच्याकडून सांगण्यात आले. इतकी नामुष्कीची वेळ या दवाखान्यात आली आहे. त्याबद्दल शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी आहे. जाणीवपूर्वक खाजगी डॉक्टरांचे नंबर दिले जात असून त्यांच्याकडून लुबाडणूक होत आहे, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. पहाल त्यावेळेला दवाखाना बंद व विचारले असता खाजगी डॉक्टरांचे नंबर दिले जातात. कोणत्याही प्रकारच्या लसी टोचल्या जात नाहीत. बर्‍याच शेतकर्‍यांची जनावरे नोंद नाहीत, अशा तक्रारी शेतकरी वर्गातून येत आहेत.
यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव, शिवजयंती उत्सव समितीचे सुरज जाधव, मराठा मोर्चा आंदोलनाचे दीपक तोडकर, प्रगतशील शेतकरी विजय जाधव, विकास जाधव, गुणाजी कुंभार व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.