येथील बसस्थानकातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील बसस्थानकातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२८ जुलै रोजी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास सातारा बस स्थानकातील मुंबई सेंट्रल प्लॅटफॉर्म समोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच. ११ एस ५६४३ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार राहुल मनोहर जंगम रा. सुर्ली, ता. कोरेगाव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिले आहे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


