maharashtra

वीज अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू


वीज अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद वाठार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : वीज अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद वाठार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भाडळे, तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत संभाजी सिताराम कदम वय 67 हे खोप नावाच्या शिवारात गुरे चारत असताना त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची खबर श्रीकांत तानाजी निकम वय 40 राहणार भाडळे, तालुका कोरेगाव यांनी वाठार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार केंजळे करीत आहेत.