maharashtra

हुतात्मा सुभेदार विजय शिंदे यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत


50 lakh assistance to the family of martyr Subhedar Vijay Shinde
लडाख प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या विसापूर (ता. खटाव) येथील हुतात्मा सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या कुटुंबियांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुसेगाव शाखेतर्फे डिफेन्स सॅलरी पॅकेजच्या माध्यमातून ५० लाखांची मदत करण्यात आली.

पुसेगाव : लडाख प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या विसापूर (ता. खटाव) येथील हुतात्मा सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या कुटुंबियांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुसेगाव शाखेतर्फे डिफेन्स सॅलरी पॅकेजच्या माध्यमातून ५० लाखांची मदत करण्यात आली. या मदतीचा धनादेश पुसेगाव शाखेचे शाखाप्रमुख ऋषभ कश्यप यांच्या हस्ते हुतात्मा विजय शिंदे यांच्या आई अरुणा व पत्नी प्रियांका यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना ऋषभ कश्यप म्हणाले, शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची देशात ख्याती आहे. येथील जवळपास प्रत्येक कुटुंबात सैनिक आहेत. पुसेगाव शाखेत काम करत असताना बँकेच्या माध्यमातून सैनिकांची सेवा करण्याची संधी मिळते याचा आनंद होतो. याप्रसंगी लाईफ इंशुरन्सचे डेव्हलपमेंट मॅनेजर सागर पवार, एसबीआय चे कर्मचारी चंद्रकात जाधव, २२ मराठा लाईट इन्फंट्रीचे सुभेदार संतोष माने आदी उपस्थित होते.